UPI व्यवहारासाठी नवीन नियम : २०२४ मधील UPI नियमांमध्ये नवीन अपडेट्स

UPI व्यवहारासाठी नवीन नियम

UPI व्यवहारासाठी नवीन नियम २०२४ मधील UPI नियमांमध्ये नवीन अपडेट्स:

UPI व्यवहारासाठी नवीन नियम


युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) संपूर्ण भारतातील व्यवहारांसाठी एक लोकप्रिय पर्याय बनला आहे. डिजिटल पेमेंटची सुरुवात झाल्यापासून याने लक्षणीय वाढ केली आहे. UPI ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व फसवेगिरी रोकण्यासाठी, २०२४ मध्ये “नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया” ने (NPCI) अनेक महत्त्वाचे बदल लागू केले आहेत.


UPI व्यवहारासाठी नवीन नियम: २०२४ मधील UPI नियमांमध्ये नवीन अपडेट्स पुढीलप्रमाणे


१. निष्क्रिय UPI निष्कासित करणे:
एका वर्षाहून अधिक काळ जे पेमेंट ॲप्स जसे की पेटीम (Paytm), गुगल पे (Google Pay), फोन पे (PhonePe) निष्क्रिय आहेत म्हणजे ज्यावर व्यवहार केलेले नाहीत ते ॲप्स आणि बँकांना संबंधीत UPI आयडी व मोबाइल नंबर निष्कासित करण्याचे निर्देश दिले आहेत. निष्क्रिय खाती आणि संभाव्य गैरवापर टाळण्यासाठी या उपायाचा उद्देश आहे.


२. व्यवहार मर्यादा:
UPI व्यवहारांसाठी 1 लाख रुपयांची नवीन कमाल दैनिक पेमेंट मर्यादा सेट केली आहे.
तथापि, 8 डिसेंबर 2024 रोजी, RBI ने शैक्षणिक आणि आरोग्य सेवा उद्देशांसाठी UPI व्यवहार मर्यादा 5 लाख रुपये केलीली आहे. पूर्वी ही मर्यादा एक लाख रुपये होती.


३. युपीआय व्यवहार शुल्क:
ऑनलाइन वॉलेट सारख्या प्रीपेड पेमेंट साधनांद्वारे (PPI) जसे की पेटीएम वॉलेट मधुन 2,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या विशिष्ट व्यापारी UPI व्यवहारांसाठी, 1.1 टक्के इंटरचेंज शुल्क लागू केले असेल. विशेष म्हणजे, व्यवहारादरम्यान वापरकर्त्यांना अतिरिक्त शुल्काचा सामना करावा लागणार नाही.


४. चार-तास व्यवहार वेळ मर्यादा:
ज्यांनी पूर्वी व्यवहार केले नाहीत त्यांच्यामध्ये 2,000 रुपयांपेक्षा जास्त प्रारंभिक पेमेंटसाठी चार तासांची मुदत असेल थोडक्यात जे अधुनमधुन अथवा कायम UPI व्यवहार करतात त्यांच्या साठी चार- तास वेळ मर्यादा नसेल.


५. UPI एटीएम:
RBI ने देशभरात UPI ATM सुरू करण्याची योजना आखली आहे. यात ATM वापरकर्त्यांना QR कोड स्कॅन करून थेट त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेता येईल.

6. UPI ट्रांसैक्शन कॅन्सल ऑप्शन :
ह्यात तुम्ही कोणत्या नवीन व्यक्तीबरोबर UPI ने व्यवहार केला, तर ते तुम्ही चार तासांच्या आत मध्ये कॅन्सल करू शकता आणि पैसे परत मिळवू शकता.

7. खरे नाव दर्शविले जाणार:
UPI स्कॅन केल्या नंतर आता जे बँक अकाऊंट मध्ये नाव असेल तेच नाव मोबाईल वर दर्शविले जाईल.

UPI व्यवहारासाठी नवीन नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top