नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे काही तत्कालीन प्रेरणादायीक वाक्ये:
“जे सैनिक नेहमी आपल्या देशाशी एकनिष्ठ राहतात, जे आपल्या प्राणांची आहुती देण्यास सदैव तयार असतात, ते अजिंक्य असतात.”
"स्वातंत्र्य दिले जात नाही, ते घेतले जाते.”
“एखाद्या व्यक्तीचा एखाद्या कल्पनेसाठी मृत्यू होऊ शकतो, परंतु ती कल्पना त्याच्या मृत्यूनंतर हजारो जीवनात अवतरते.”
“स्वतःच्या रक्ताने आपल्या स्वातंत्र्याची किंमत चुकवावी हे आपले कर्तव्य आहे. जे स्वातंत्र्य आपण आपल्या बलिदानाने आणि परिश्रमाने मिळवू, ते आपण आपल्या बळावर टिकवू शकू.”
“चर्चा करून इतिहासात कोणताही वास्तविक बदल कधीच साधला गेला नाही.”
“राजकीय सौदेबाजीचे रहस्य म्हणजे तुम्ही खरोखर काय आहात त्यापेक्षा अधिक मजबूत दिसणे.”
“तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन.”